नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सातारच्या दोन खेळाडूंची निवड
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ सप्टेंबर - पश्चिम बंगाल येथे ३ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या सब ज्युनियर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप २०२३-२४ या स्पर्धेसाठी सातारा येथील आकाशकुमार यादव व अर्जुन धनवडे या खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे.
पोलीस बॉईज फुटबॉल क्लबचे मेंबर असलेले आकाशकुमार यादव व अर्जुन धनवडे यांना सातारा पोलीसमध्ये कार्यरत असणारे कोच आक्रम मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आकाशकुमार व अर्जुन यांची निवड नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात झाल्यानंतर दोघांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या दोघांचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा जिल्हा फुटबॉल संघटना यांनी अभिनंदन केले.
No comments