आंतरराष्ट्रीय कबुतर स्पर्धेत फलटणच्या अमित काकडे व सिद्धार्थ अहिवळे यांचे यश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - महाराष्ट्र कबुतर केसरी २०२३ या आंतरराष्ट्रीय स्तरीय स्पर्धेचे सांगली येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आमित भाग्यवंत काकडे यांचा चतुर्थ क्रमांक तर जिल्हास्तरावर सिद्धार्थ अहिवळे यांचा प्रथम क्रमांक आला.
अमित काकडे यांना बक्षीस वितरण करताना मान्यवर |
पिजन फ्लायर असोसिएशन, (इस्लामपूर) प्रस्तुत महाराष्ट्र कबुतर केसरी २०२३ आंतरराष्ट्रीय स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र कबूतर केसरी २०२३ या स्पर्धेचे स्वरूप, प्रथम क्रमांक ४ लाख १ रुपये व मानाची गदा, द्वितीय क्रमांक २ लाख १ रुपये ट्रॉफी व निशाण, तृतीय क्रमांक १ लाख १ रुपये ट्रॉफी व निशाण, चतुर्थ क्रमांक ५० हजार १ रुपये ट्रॉफी व निशाण, पाचवा क्रमांक २५ हजार १ रुपये या प्रमाणे होते. तसेच जिल्हास्तरावर देखील वेगळी बक्षीस देण्यात आली.
सिद्धार्थ अहिवळे यांना बक्षीस वितरण करताना मान्यवर |
या स्पर्धेत अमित काकडे यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे. तर जिल्हास्तरावर वस्ताद सिद्धार्थ अहिवळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. पिजन फ्लायर असोसिएशन प्रस्तुत महाराष्ट्र कबुतर केसरी २०२३ या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व मानसन्मान सोळाह रविवारी दिनांक १७/९/२०२३ रोजी वृंदावण गार्डन, मल्टीफ्लेक्स थिएटर जवळ सांगली येथे पार पडला. या बक्षीस वितरण समारंभ वेळी स्पर्धकांसह कबुतर प्रेमी प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
No comments