Breaking News

तेजसिंह भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

वाढदिवसानिमित्त तेजसिंह भोसले व सौ. मृणालिनी भोसले यांना शुभेच्छा देताना श्री सद्गुरु व महाराजा संस्था समुहाचे सी.ई.ओ. संदीप जगताप समवेत कर्मचारी वृंद
Tejsinh Bhosle's birthday is celebrated with enthusiasm

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.

    तेजसिंह भोसले यांनी सकाळी श्री सद्गुरू हरीबाबा यांचे दर्शन घेतले. त्याचबरोबर पिताश्री दिलीपसिंह भोसले, मातोश्री अॅड. सौ. मधुबाला भोसले यांचे आशीर्वाद घेतले. सुविद्य पत्नी सौ. मृणालिनी भोसले, सौ. प्रियदर्शनी भोसले, मातोश्री अॅड. सौ मधुबाला भोसले यांनी त्यांचे औक्षण केले.

    विधान परिषदेचे मा. सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीराम बझारचे मार्गदर्शक संचालक महादेवराव पवार, चेअरमन जितेंद्र पवार, नानासाहेब पवार, मोहिम प्राणायाम क्लबचे सर्व सदस्य,  श्रीराम बझारचे संचालक, कर्मचारी, श्री सद्गुरु उद्योग समुहाचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, महाराजा उद्योग समुहाचे पदाधिकारी, सहकार महर्षी हणमंतराव पवार कुक्कुटपालन संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी, स्वयंसिद्धा महिला संस्था समुहाचे पदाधिकारी, कर्मचारी, ब्रिलीयंट अॅकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूलचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कॅप्टन भोसले हेल्थ क्लबचे पदाधिकारी, प्रशिक्षक सभासद आदींनी त्यांना प्रत्यक्ष, दूरध्वनीद्वारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

    तसेच त्यांच्या वाढदिवसानिमत्त आरोग्य तपासणी व नेत्रचिकित्सा शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात अनेकांनी लाभ घेतला असल्याचे सद्गुरु महाराजा उद्योगसमूहाचे सी. ई. ओ. संदीप जगताप यांनी याप्रसंगी सांगितले. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले सद्गुरु पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजाराम फणसे, प्रभाकर भोसले, श्री सद्गुरु हरिबुवा महाराज गृहतारण संस्थेचे चेअरमन तुषारभाई गांधी, महाराजा मल्टीस्टेट व्हॉइस चेअरमन रणजितसिंह भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. स्वयंसिद्धा संस्था समूहाच्या संचालिका सौ. मृणालिनी भोसले, श्री बाबर साहेब, संचालक सुनील पोरे, तसेच सौ. मृणालिनी भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

    या कार्यक्रमास सद्गुरु व महाराजा व स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच नेत्रचिकित्सा शिबिरासाठी आलेले लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सी. ई. ओ. संदीप जगताप यांनी केले.

No comments