लोणंद नगरपंचायत येथे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
लोणंद नगरपंचायत येथे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करताना मान्यवर (छाया - दिलीप वाघमारे, लोणंद) |
लोणंद (गंधवार्ता वृत्तसेवा) - भारतीय स्वातंत्र्य लढयातील सशस्त्र क्रांतीची सुरुवात करणारे, सर्व प्रथम स्वातंत्र्याचा जाहिरनामा काढणारे ब्रिटिश सत्तेला सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणारे, आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांची २३२ वी जयंती उमाजी नाईकांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करून नगरपंचायत लोणंद येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी लोणंद नगर पंचायत नगराध्यक्षा सीमा खरात, उपनगराध्यक्ष रविंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सुवर्णगाथा कमिटीचे अध्यक्ष डॉ. नितिन सावंत, खंडाळा तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्फराज बागवान, नगरसेवक शिवाजीराव शेळके, भरत शेळके, भरत बोडरे, गणीभाई कच्छी, सागर शेळके, म्हस्कुआणणा शेळके, वैभव खरात, असगर इनामदार, ओमकार कर्णवर, अशोक शिरतोडे, प्रविण भंडलकर, अमित भंडलकर, विशाल भंडलकर आदी नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
No comments