फलटण येथे महावीर स्तंभाला ट्रकची धडक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ सप्टेंबर - शहरातील महावीर स्तंभाला आयशार ट्रकने धडक दिल्याने, महावीर स्तंभाचे रेलिंग उध्वस्त झाले आहे. दरम्यान ट्रक चालक फरारी झाला असून, पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे व आयशर ट्रक देखील पोलीस स्टेशनला नेण्यात आला आहे.
फलटण येथील रविवार पेठेतील महावीर स्तंभाला आयशर ट्रक क्रमांक एम एच ०५ ई एल ७८१५ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक हलगर्जीपणाने चालवत स्तंभाला धडक दिली आहे. या संदर्भात ट्रक मधील एक जण दारूच्या नशेत पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर आयशर ट्रक फलटण शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आला आहे.
Post Comment
No comments