युवकाचा खून करून हातपाय बांधून कॅनॉलमध्ये फेकले ; विडणी येथे सापडला मृतदेह
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ सप्टेंबर - युवकास जीवे ठार मारून पुरावा, नष्ट करण्याच्या उद्देशाने हातपाय रस्सीने कंबरेला बांधून, त्याला निरा उजवा कॅनॉलमध्ये टाकून देण्यात आले. सदर युवकाचा मृतदेह विडणी, ता. फलटण येथे सापडला आहे. अद्याप मयत युवकाची ओळख पटलेली नाही.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९/०९/२०२३ रोजीचे सकाळी ०८:२६ वाजण्याच्या पुर्वी (नक्की वेळ माहित नाही) मौजे विडणी ता. फलटण गावचे हद्दीत निरा उजवा कॅनॉलवरील गावपुलाचे शेजारी लिप्ट क्रमांक ०२ येथे, अंदाजे २५ ते ३० वर्षीय युवकास जिवे ठार मारून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हातपाय एका जाडसर रस्सीने कंबरेला बांधून त्यास निरा उजवा कॅनॉलच्या पाण्यामध्ये टाकून देवून त्याचा खून केला आहे.
मयत युवकाचे वर्णन - उंची - १६५ सेंटीमिटर, रंग सावळा, केस काळे, अंगाने- सडपातळ मयताच्या अंगात फुल बाहयाचा निळया रंगाचा व त्यावर गडद आणि फिक्कट आडव्या पट्टया असलेला शर्ट, काळ्या रंगाची फूल पॅन्ट, जांभळया रंगाची अमोल माचो कंपनीची ८५ नंबरची अंडरवेअर व पांढरे रंगाचे हाफ बनियन
तरी मयत युवका बाबत काही माहिती असेल तर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक मो. 9823562255, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन 02166-222533
No comments