धनगर समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा फटका बारामतीला बसणार - आमदार गोपीचंद पडळकर
सातारा - धनगर समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा फटका बारामतीला बसणार असल्यानेच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध करत धनगर आणि धनगड असा प्रश्न निर्माण केला आहे. शरद पवारच धनगर आरक्षणातील मोठा अडसर असल्याची टीका धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. धनगर आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून, या लढाईसाठी सर्व धनगर बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे.आतापर्यंत आपला केवळ मतांसाठीच वापर केला आहे.यापुढील काळात आपण निर्णयप्रक्रियेत जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितल.लोणंद येथील धनगर आरक्षणाबाबत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
शरद पवारांनी धनगड आणि धनगर वेगळा असल्याचे सांगितले मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टात शपथपत्र सादर करून धनगड आणि धनगर ही जात एकच असल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्या आरक्षणाच्या लढाईला पाठबळ मिळाले.आपली लढाई सरकारी दरवारी आणि रस्त्यावर सुरू आहे. आपण सर्वांनी रस्त्यावर उतरून ताकद दाखवावी लागणार असुन घरात बसून आरक्षण मिळणार नाही. महाराष्ट्रातील धनगरांची ताकद दाखवायची वेळ आली आहे.जोपर्यंत धनगराच्या पोराला एसटीचा दाखला मिळत नाही त्याची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत सर्वांनी ताकतीने या लढ्यात उतरले पाहिजे असेही आ. पडळकर म्हणाले.
No comments