खोजेवाडी येथे गांजाची झाडे लावणाऱ्याला अटक
सातारा - खोजेवाडी तालुका सातारा येथे गांजाची आल्याच्या शेतामध्ये 18 झाडे लावणाऱ्या शेतकऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे .गांजाच्या 18 झाडांचे 109 किलो वजन भरले असून हा 27 लाख 34 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे लहू कुंडलीक घोरपडे व 62 राहणार खोजेवाडी असे संबंधित इसमाचे नाव आहे . बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .
याबाबतची अधिक माहिती अशी अमली पदार्थ व्यापाऱ्यांच्या संदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करून देवकर यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खोजेवाडी येथे गांजाची शेती होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी गावात जाऊन माहिती घेतली असता 62 वर्षीय घोरपडे नावाच्या शेतकऱ्याने त्याच्या आल्याच्या शेतामध्ये गांजाच्या 18 झाडांची लागवड केली होती असे आढळून आले .
पोलिसांनी घोरपडे याला विचारले असता हे शेत कोणाचे तर त्याने हे शेत आपले असल्याचे सांगितले पोलिसांनी 109 किलो वजनाची गांजाची 18 झाडे जप्त केली बाजारपेठेमध्ये या गांजाची 27 लाख 34 हजार पाचशे रुपये किंमत आहे घोरपडे याच्यावर उत्तेजक द्रव्यमनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे ,लक्ष्मण जगधने, शिवाजी इंगवले, हसन तडवी, शिवाजी भिसे, राजू कांबळे, गणेश कापरे, अमित माने यांनी कारवाईत भाग घेतला होता.
No comments