मराठा समाजाला सरकार आरक्षण देईल याची खात्री - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)- कुठल्याही जाती जमातीच्या आरक्षणाला धक्का न लागता, जरांगे-पाटील यांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये काही तांत्रिक व कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन विद्यमान सरकारकडून मराठा आरक्षण देण्यात येईल अशी आपणास खात्री असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणाबरोबरीने आज पासुन आमरण उपोषणासही प्रारंभ करण्यात आला आहे. आंदोलनस्थळी आज विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट दिली. याप्रसंगी श्रीमंत रामराजे बोलत होते.
मराठा आरक्षण प्रकरणी, सर्वत्र आंदोलने सुरू आहेत, आपल्या तालुक्यात या प्रसंगातुन कुठे काही दुर्घटना घडू नये आणि आरक्षणाचा प्रश्न सामंज्यसाने सुटावा अशी विनंती करुन सर्वांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन श्रीमंत रामराजे यांनी यावेळी केले. यावेळी आंदोलकांच्या भावना शासनापर्यंत रामराजे यांनी पोहचवाव्यात अशी आंदोलकांनी अपेक्षा व्यक्त करताच, आपण काळजी करु नका, माझे शंभर टक्के लक्ष आहे असे सांगत आंदोलकांना अश्वस्त केले.
No comments