बापूराव गावडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - फलटण पूर्व भागातील राजेगटाचे निष्ठावंत कार्यकर्ते, संजय गांधी निराधार योजनेचे फलटण तालुकाध्यक्ष व खटकेवस्ती गावचे सरपंच बापूराव गावडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
दि. ६ ऑक्टोबर रोजी वाढदिनी बापूराव गावडे यांनी सकाळी ग्रामदैवतांचे दर्शन घेतल्यानंतर, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. नंतर पत्नी फलटण पंचायत माजी सभापती वैशाली बापूराव गावडे यांनी त्यांचे औक्षण करून, त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी चिरंजीव अक्षय गावडे व स्नुषा व परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
बापूराव गावडे यांना विधान परिषदेचे माजी सभापती विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दत्तमामा भरणे, आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर,श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर, मुकुंदकाका रनवरे, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर गुणवरे जिल्हा परिषद गटातील राजे गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, त्यांचे सर्व पदाधिकारी फलटण तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, कार्यकर्ते यांनी बापूराव गावडे यांना प्रत्यक्ष व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी ६ वाजता कुमार देवकाते प्रस्तुत महा मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी विजेत्या स्पर्धकांना एलईडी टीव्ही, गॅस शेगडी, कुकर व अनेक बक्षिसे देण्यात आली. सिने अभिनेत्री स्नेहा पिंपरीकर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक अनिल काकडे हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. या कार्यक्रमासाठी विकासरत्न सरपंच बापूराव गावडे युवा मंच पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला भगिनी कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments