जिल्हास्तरीय आर्चरी धनुर्विद्या स्पर्धेत शानभाग विद्यालयाचा शार्विल माने पहिला
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ - येथील श्यामसुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के. एस .डी .शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजमधील इयत्ता दहावी क मध्ये शिकणारा शार्विल राजेंद्र माने या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय आर्चरी अर्थात धनुर्विद्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे .
17 वर्षाखालील गटात कंपाउंड कॅटेगिरी मध्ये झालेल्या या स्पर्धेत शार्विल माने याने प्रथम क्रमांक मिळवला आहे .
पाचगणी येथे असणाऱ्या विद्यानिकेतन स्कूलमध्ये या जिल्हास्तरीय धनुर्विद्या आर्चरी स्पर्धा संपन्न झाल्या . शार्विलची आता झोनल टूर्नामेंट साठी निवड झाली असून या स्पर्धा पाचगणी येथील बिलिमोरिया हायस्कूल येथे संपन्न होणार आहेत .
शार्विल याला प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून धनश्री जाधव यांचे मार्गदर्शन लाभले .
शार्विल याच्या या यशाबद्दल के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विश्वस्त सौ.उषा शानभाग ,संचालिका सौ.आचल घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments