Breaking News

जिंती येथे घरफोडी ; ४२ तोळे सोन्याचे दागिने लंपास

Burglary at Jinti;  42 tola gold jewelery stolen

   फलटण (गंधवार्ता  वृत्तसेवा) दि.२५ : जिंती, ता. फलटण येथील बंद बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून बंगल्यातील २ बेडरुम मधील कपाटे उघडून, त्यामधील साहित्य अस्ताव्यस्त टाकून, कपाटातील ४२ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सुमारे १७ लाख १२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांने चोरून नेला. गुन्ह्याची नोंद फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून ठसे तज्ञ, श्वान पथकाच्या मदतीने पोलिस तपास करीत आहेत.

      याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेशन बंगला, जिंती, ता. फलटण येथील रहिवासी औषध दुकानदार आदित्य अशोक रणवरे वय ३२ वर्ष यांनी याबाबत फिर्याद दिली असून कुटुंबीयांसमवेत ते रविवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी बंगल्याला कुलुप लावून, देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे गेले असता, रविवार सकाळी ते सोमवार दि. २३ रोजी सकाळी या कालावधीत अज्ञाताने बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून, घरात प्रवेश करुन, कपाटातील ४२ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सुमारे १७ लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत, त्यामध्ये २ लाख रुपये किमतीचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण त्यास २ डोरली, सोन्याचे ४ मणी तसेच सोन्याचे साखळी मध्ये गुंफलेले सोन्याचे व काळे मणी, १ लाख २० हजार रुपये किमतीचे सुमारे ३ तोळे वजनाचे चोकर ३ पदरात गुंफलेला, मध्यभागी गोलाकार पेंडल, पेंडलला खालील बाजूस घुंगराचे आकाराचे मणी, २ लाख रुपये किमतीच्या ५ तोळे वजनाच्या नक्षीची डिझाईन असलेल्या सोन्याच्या ४ बांगड्या, २ लाख रुपये किमतीच्या ५ तोळे वजनाच्या नक्षीची डिझाईन असलेल्या २ पाटल्या, ४० हजार रुपये किमतीचा सुमारे एक तोळा वजनाचा सोन्याचा कानातील झुमके व फुलांचा जोड, ३२ हजार रुपये किमतीच्या सुमारे ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ४ लेडीज अंगठ्या, १ लाख २० हजार रुपये किमतीची सुमारे ३ तोळे वजनाची साखळी मध्ये गुंफलेली सोन्याची चेन, २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व मध्यभागी पेंडल आणि सुमारे ५ लाख ६० हजार रुपये किमतीचे १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ४२ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सुमारे १७ लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे अज्ञाताने चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

     फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांचे मार्गदर्शनाखाली साखरवाडी पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस उप निरीक्षक सागर अरगडे तपास करीत आहे.

No comments