श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस जल्लोषात ; क्रेनद्वारे घातला हार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध संघटना व पदाधिकाऱ्यांनी फलटण शहर व तालुक्यात विविध उपक्रम राबवून, आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी क्रेनच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे यांना भला मोठा हार व शाही पगडी घालून अभिष्टचिंतन करण्यात आले.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सकाळी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर आप्तेष्ट व जनतेच्या शुभेच्छा स्वीकारल्या. श्रीमंत संजीवराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळी ०८.०० वाजल्यापासूनच सरोज व्हिला, लक्ष्मीनगर, फलटण या निवासस्थानी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती, ती गर्दी दुपारपर्यंत हटली नाही. सकाळपासून विविध मान्यवर तसेच नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला हार पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. गर्दीमध्ये प्रामुख्याने युवा वर्ग मोठ्या प्रमाणात होता. यावेळी श्रीमंत रामराजे मोटार वाहतूक संस्थेच्या वतीने वाद्याच्या तालावर, क्रेनच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे यांना भला मोठा हार व शाही पगडी घालून अभिष्टचिंतन करण्यात आले.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने,श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, फलटण व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने, शनिवार दि. ०७/१०/२०२३ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, फलटण येथे करण्यात आले होते. यामध्ये १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
फडतरवाडी तालुका फलटण येथे, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व सर्व ग्रामस्थ फडतरवाडी यांच्या वतीने, रविवार दिनांक ०८/१०/२०२३ रोजी रक्तदान शिबिर तसेच मोफत मोतीबिंदु तपासणी, शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात केले होते. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट किंवा पाण्याचा जार भेटवस्तु स्वरुपात देण्यात आले.
आज सोमवार दि.०९.१०.२०१३ रोजी सकाळी ९.०० वाजता, सरोज व्हिला लक्ष्मीनगर, फलटण येथे श्रीमंत संजीवराजे युवा मित्र मंडळ तरडगाव यांच्यावतीने, महात्मा शिक्षणसंस्था संचलित मूक बधिर विद्यालय, ठाकुरकी फलटण येथील विद्यार्थी व विद्यार्थीनींना,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ड्रेस वाटप करण्यात येणार आहे. यावेळी आमदार दिपकराव चव्हाण, दादासाहेब चोरमले उपस्थित होते.
शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळ व मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने, सोमवार दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी विद्यार्थी व शिक्षक यांच्या रंगभरण स्पर्धा मा.नगरसेवक श्री.किशोरसिंह नाईक निंबाळकर, मा.नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी आयोजित केली होती.
मुधोजी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये देखील, रांगोळी, चित्रकला स्पर्धा घेऊन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
No comments