18 ऑक्टोबर पासून साताऱ्यात छत्रपती कृषी 2023 महोत्सवाचे आयोजन
सातारा - येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर स्मार्ट एक्स्पो ग्रुप सांगली च्या व्यवस्थापन अन्तर्गत व मा.श्रीमंत छ. उदयन राजे भोसले मित्र समूह , जय सोशल फौंडेशन चे वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती कृषी 2023 या कृषी औद्योगिक व वाहन महोत्सवाचे प्रदर्शन आयोजन दिनांक 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलेले आहे
या महोत्सवामध्ये स्पर्धा ,ज्ञान ,विज्ञान आणि मनोरंजनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती या प्रदर्शनाचे संयोजक व स्मार्ट एक्सपोचे प्रमुख संचालक सोमनाथ शेटे यांनी सांगितले. गेली पाच वर्षे साताऱ्यात या कृषी महोत्सवाचे आयोजन यशस्वीपणे करणाऱ्या स्मार्ट एक्सपोच्या वतीने यावर्षी या प्रदर्शनात कर्नाटक येथील मालक यांनी खरेदी केलेला तब्बल दीड कोटी रुपये किंमत असलेला धष्टपुष्ट रेडा हे खास आकर्षण असणार आहे .
याचबरोबर या महोत्सवामध्ये 18 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत या कृषी महोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
सातारा जिल्ह्याचे लाडके राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सह राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले , कृषी मार्गदर्शक आणि कृषी तज्ञ डॉ.बुधाजीराव मुळीक, जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती सुनील तात्या काटकर,जिल्हा कृषी अधीक्षक उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदास काळे ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ,कृषी विकास अधिकारीयांचे सह या प्रदर्शनाचे मुख्य संयोजक स्मार्ट एक्सपोचे सोमनाथ शेटे, जय फाउंडेशनचे सागर भोसले ,प्रीतम कळसकर ,माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे ,माजी नगराध्यक्ष सौ.रंजना रावत यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी आणि तज्ञ मार्गदर्शक या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
सुमारे 225 स्टॉल या महोत्सवात सहभाग झाले असून यामध्ये कृषी अवजारे ,कृषी तंत्रज्ञान ,औद्योगिक माहिती देणारी प्रदर्शने तसेच विविध प्रकारच्या नामवंत कंपन्यांची नवीन उत्पादन केलेली वाहने या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत .सातारकरांच्या करमणुकीसाठी आणि मनोरंजनासाठी येथे जत्राही उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे .
या महोत्सवाच्या कृषी प्रदर्शनाच्या भव्य मंडप उभारणी तसेच प्रदर्शनाच्या स्टॉल उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे .या महोत्सवामध्ये विशेष आकर्षण म्हणून दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत विविध देशी -विदेशी जातीच्या डॉगचा शो आयोजित केला असून याच दिवशी सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत खेळ पैठणीचा खेळ मनोरंजनाचा असा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता डॉ. सुभाष गोष्टी यांचा हिप्नॉटिझम हा खेळ मनामनांचा कार्यक्रम सादर होणार असून दिनांक 21 व 22 ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता सरगम पूजन म्युझिक यांचा वाद्य संगीताचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.या प्रदर्शनाचे उभारणीमध्ये शेटे परिवारांच्या वतीने विशेष सहकार्य मिळत असून सोमनाथ शेटे यांच्या सुविद्य पत्नी सौ .रेखा शेटे ,शेटे यांचे बंधू संदीप शेटे तसेच या संपूर्ण इव्हेंटचे मॅनेजमेंट पाहणारे व्यवस्थापक सचिन एडके यांची विशेष मदत यावेळी होत असते. 225 होऊन देशातील अनेक मान्यवर क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग या स्टॉलमध्ये असून 225 स्टॉल ची उभारणी आता अंतिम टप्प्यात आली आहे .
या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की 2013 सालापासून स्मार्ट एक्सपो च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, ,लासलगाव, शिर्डी, नाशिक ,औरंगाबाद ,सोलापूर ,अक्कलकोट ,तासगाव सांगली पुसेगाव, कोल्हापूर जिल्हा,लोणंद या ठिकाणी अशी कृषी प्रदर्शने भरवण्यात आली होती .
सातारकर जिल्हा वासियांसाठी खवय्यांना इथे मोठी पर्वणी असून विविध चमचमीत टेस्टी पदार्थांचे व्हेज, नॉनव्हेज प्रकारचे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत .
बालगोपाळांसाठी मनोरंजन नगरीची ही उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे या सर्व प्रदर्शनाचा लाभ सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा तसेच खास शेतकऱ्यांनी बनवलेली उत्पादने ग्राहकांना थेट योग्य दरात मिळावी यासाठीच ही उपलब्धता या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती यावेळी सोमनाथ शेटे यांनी दिली. दसरा-दिवाळीची येऊ घातलेली पर्वणी लक्षात घेतात खरेदीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने एक पर्वणी ठरणार आहे असेही सोमनाथ शेटे यांनी सांगितले.
No comments