Cleanliness campaign completed in Annapurna Devi Temple and Jadhavwadi area
जाधववाडी (गंधवार्ता वृत्तसेवा) - जाधववाडी (फ) ता. फलटण जि. सातारा येथिल श्री अन्नपुर्णा देवी मंदीर येथे नवरात्री उत्सवाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य सौ. सारिकाताई संदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात व योग्य नियोजनाने सुरू आहे. रोज महिलांसाठी वेगवेगळे तसेच गावातील ग्रामस्थांसाठी सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले असून, ग्रामस्थांनी तसेच महिलांनी मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शवत या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
नवरात्र उत्सवात सातवी माळ असल्याने श्री. अन्नपुर्णा देवस्थान तसेच श्री. संत ज्ञानेश्वर माऊली सेवा दल तरडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नपुर्णा मंदिर तसेच जाधववाडी गाव येथे, ग्रामपंचायत सदस्य सौ. सारीकाताई संदिप चव्हाण यांच्या कल्पनेतून व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ही स्वच्छता मोहीम जाधववाडी परीसरात अन्नपूर्णा मंदिर, साई मंदिर, गणेश मंदिर तसेच रंधवे वस्ती, बिरदेवनगर परीसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परीसर, गिरवी रोड ते जाधववाडी रोड वरील परीसर इ. ठिकाणी राबवून, या परीसराची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता अभियानात जाधववाडी ग्रामस्थ तसेच अन्नपुर्णा मंदिर परीसरातील नागरिक सहभागी झाले होते. या उपक्रमाबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कौतुक करून भविष्यातही असे चांगले उपक्रम आयोजित करावे असे सांगितले.
No comments