Breaking News

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून अंदाजे 9 ते 10 टन निर्माल्य गोळा

Dr. Mr. Approximately 9 to 10 tons of Nirmalya collected from Nanasaheb Dharmadhikari Foundation

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  -   रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड येथील डॉ. श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने फलटण येथे पंढरपुर पूल , जिंती नाका पूल , इरिगेशन बंगला कोळकी येथे अनंत चतुर्थी दिवशी अंदाजे 9 ते 10 टन निर्माल्य गोळा करण्यात आले .

    गुरूवारी दिवसभर निर्माल्य गोळा करण्यात आले . अंदाजे 9 ते 10 टन निर्माल्य सकाळी 7.00 वाजल्यापासून रात्री 8.00 वाजेपर्यत 350 ते 400
श्रीसदस्यांमार्फत निर्माल्य गोळा करण्यात आले .पाणी प्रदूषण होवू नये व पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने गेल्या 6 वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविला जातो .निर्माल्यांचे कंपोस्ट खत तयार करून ते खत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या झाडांना घालण्यात येणार आहे .  या निर्माल्य उपक्रमाचे फलटण शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे .
 

No comments