फलटण तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ - डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपत असलेल्या, नवीन स्थापित झालेल्या, चुकीच्या प्रभागरचनेमुळे निवडणुका न झालेल्या राज्यातील २, ३५९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक आणि २,१५० रिक्त जागांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये फलटण तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींसह दहा ग्रामपंचायतींच्या तेरा जागांच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे.
फलटण तालुक्यातील उपळवे, दऱ्याचीवाडी, सावंतवाडी, जाधवनगर या ४ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच पदांसह निवडणुका आणि मलवडी, पिराचीवाडी, ढवळेवाडी (आसू), होळ, मुरुम, निरगुडी, विंचुर्णी, सासकल या ८ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी १ रिक्त आणि गोळेवाडी ३ व परहर बुद्रुक २ या पुनर्वसित गावांमध्ये रिक्त जागांसाठी पोट निवडणुका होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे. दि. ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून दि. १६ ते २० ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. दि. २३ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी, दि. २५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वा. निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतीम यादी जाहीर होणार आहे. रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान व सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
No comments