मराठा आरक्षणासाठी कराड येथे भव्य मोर्चा
सातारा - एक मराठा लाख मराठा... कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय ... आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं या ना अशा घोषणा देत कराड तालुका मराठा समाजाच्या वतीने आज मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला आहे मोर्चामध्ये हजारो आबाला विरुद्ध सहभागी झाले . .मराठा समाजाच्या आरक्षण मिळवण्यासाठी च्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला 50% च्या आत आरक्षण मिळावे .यासाठी हा मोर्चा काढण्यात आला .
या मोर्चामध्ये कराड तालुक्यातील अनेक गावातील आबाल वृद्ध हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा सुरू झाला .त्यानंतर तहसीलदार कार्यालय प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाच्या मार्गावर भव्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस निरीक्षक यांच्यासह 18 अधिकारी, शंभर पोलीस कर्मचारी, दोन सुरक्षा दलाच्या तुकड्या व वाहतूक शाखेचे 34 कर्मचारी, साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . मराठा समाजाच्या आंदोलकांनी आलेल्या वाहनांसाठी विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.
No comments