फलटण येथे मराठा आंदोलनास वाढता पाठिंबा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी फलटण येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणाच्याबरोबरीने आमरण उपोषणासही प्रारंभ करण्यात आला आहे. आमरण उपोषणामध्येही सहभाग घेणाऱ्यांची संख्या वाढत असून आज या उपोषणामध्ये सहभागी झालेल्यांची संख्या बावीस झाली आहे. आजही या आंदोलनास विविध सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
आज आमरण उपोषणच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन स्थळी युवा कीर्तनकार हभप नम्रता महाराज कर्वे यांचे कीर्तन झाले. मराठा समाजाच्या या आंदोलनास फलटण तालुका मराठा डॉक्टर्स असोसिएशन (सदस्य व सदस्या) तसेच फलटण तालुका मराठा मेडिकल असोसिएशनचे मराठा सदस्य यांनी आमरण व साखळी उपोषणाला भेट दिली व राज्य सरकारने ताबडतोब मराठा समाजाला ओबीसी प्रवर्ग व सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची एकमुखी मागणी केली. आज मराठा समाजाच्या आंदोलनाला फलटण तालुका रास्त भाव दुकानदार संघटना, सकल मातंग समाज, भारतीय युवा पँथर संघटना महाराष्ट्र राज्य, दलित पँथर डॉ. घनशाम भोसले, श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी, फलटण, फलटण शहर सिंधी समाज, फलटण तालुका सिड्स,पेस्टींसाईड अँड फर्टिलायझर्स डिलर्स असोसिएशन, साठे, पवारवाडी, ढवळेवाडी (आसू), खटकेवस्ती, गोखळी या ग्रामपंचायतींच्यावतीने जाहीर लेखी पाठिंबा देण्यात आला आहे.
दरम्यान आमरण उपोषण आंदोलनामध्ये ज्ञानेश्वर सावंत, शंभुराज खलाटे, दत्तात्रय गुंजवटे, राहुल निंबाळकर, रणजित निंबाळकर, अमोल सस्ते, विक्रमसिंह शितोळे, युवराज सस्ते, शरद सस्ते, यशवंत खलाटे, ज्ञानेश्वर दिघे, सुनिल तोडकर, अरविंद शिंदे, हणमंतराव जगताप, आत्माराम बळीप, सुर्यकांत सापते, राजकुमार शिंदे, अक्षय तावरे, संदिप निंबाळकर, हनुमंत जाधव, विक्रम झांजुर्णे, दीपक फाळके या बावीस मराठा योद्धांचा समावेश आहे.
No comments