वकील बांधवांकडून मराठा साखळी उपोषणास पाठिंबा
Lawyers support Maratha chain hunger strike
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ -मराठा आरक्षण संर्दभाने फलटण येथे सुरू असलेल्या, मराठा क्रांती मोर्चाच्या साखळी उपोषणास समस्त मराठा वकील बांधवांनी पाठींबा जाहीर असून, आज उपोषण स्थळी पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
समस्त मराठा वकिल बांधवांकडून देण्यात आलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणा बाबत साखळी उपोषणाच्या मार्गदर्शन व सुचने नुसार फलटण येथे आज दिनांक २५ ऑक्टोबर २२०३ रोजी पासुन सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षण मिळणे बाबत चालु असलेल्या साखळी उपोषणास फलटण तालुक्यातील समस्त मराठा वकिल बांधवांचा सदरील साखळी उपोषणास संपूर्ण पाठिंबा असुन, आवश्यक त्या ठिकाणी लागणारे कायदेशीर लढाईस विनाशुल्क मदत करण्यास फलटण तालुक्यातील मराठा समाजाचे सर्व वकिल बांधव सदैव तयार आहेत.
No comments