मनोज जरांगे पाटील यांची फलटण येथे शुक्रवारी सभा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - छत्रपती शिवाजी महाराज यांची सासुरवाडी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजोळी फलटण येथे शुक्रवार दि.20 ऑक्टोबर रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या समन्वयकांनी दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून तसेच 50 टक्केच्या आतमध्ये आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करून राज्य व केंद्र सरकारने मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना येथे कोट्यवधी मराठा समाज एकत्र करून 14 ऑक्टोबर रोजी जागतिक विक्रम करीत, मोठी सभा घेतली व आठ दिवसांचा राज्य सरकारला अल्टीमेटम दिला असून, प्रथमच जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्रात येत असून ते ऐतिहासिक फलटण नगरीत येत आहेत.
दरम्यान मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे शुक्रवार दि.20 ऑक्टोबर रोजी त्यांचे सायंकाळी 7 वाजता फलटण येथे येत असून, पश्चिम महाराष्ट्रात फलटण नगरीत त्यांचे मराठा क्रांती मोर्चा फलटण च्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार असून, 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सभेला व मराठा समाजाला 50 टक्केच्या आतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत आहेत, यामुळे आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाजाला करण्यात आले आहे.
No comments