मुधोजी महाविद्यालयास खो-खो स्पर्धेचे उपविजेतेपद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे संपन्न झालेल्या सातारा विभागीय खो-खो महिला स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयास उपविजेतेपद मिळाले. बादफेरीच्या स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाने डी.पी.भोसले कॉलेज, कोरेगाव,शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालय, कराड,कला महाविद्यालय, नागठाणे या संघावरती विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अतितटीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये एस.जी.एम. कॉलेज,कराड यांच्याकडून हार पत्करावी लागली व मुधोजी महाविद्यालयास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या संघामध्ये पूजा फडतरे, साक्षी कुंभार, मुस्कान नगरजी,वर्षा यादव,तुळसा शिंदे,कोमल शिंदे,विशाखा पवार,वैष्णवी खलाटे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,
सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच.कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
No comments