Breaking News

मुधोजी महाविद्यालयास जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद

Mudhoji College won the district level volleyball tournament

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विभागीय जिल्हास्तरीय स्पर्धा २०२३-२४ डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कराड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल महिला स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयास विजेतेपद मिळाले. बादफेरीच्या स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाने महिला महाविद्यालय कराड, वेणूताई चव्हाण कॉलेज कराड, शहाजीराजे महाविद्यालय खटाव या संघावरती सरळ सेटमध्ये विजय मिळवत, सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आणि विजेतेपदाची हॅट्रिक साजरी केली या संघामध्ये श्रद्धा शिंदे, अर्पिता गायकवाड, वैष्णवी फडतरे, साक्षी गायकवाड, श्रद्धा निंबाळकर, शिवानी शिंदे, साक्षी शिंदे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.

    फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच.कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments