मुधोजी हायस्कूलच्या 14 वर्षाखालील मुलींच्या हॉकी संघाची सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० - कोल्हापुर येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम कोल्हापूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेतील पहिला सामना इचलकरंजी म.न.पा .संघ विरुद्ध खेळण्यात आला हा सामना ६-० ने जिंकून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीचा सामना कोल्हापूर जिल्हा विरुद्ध झाला हा सामना देखील ५-० ने जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेतील अंतिम सामना कोल्हापूर म.न.पा संघविरुद्ध झाला. हा सामना अत्यंत चुरशीने खेळण्यात आला या सामन्यांमध्ये निर्णय गोल संघाची सेंटर फॉरवर्ड कुमारी वेदिका वाघमोरे हिने नोंदवला व सलग दुसऱ्या वर्षी या वयोगटांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला.
या विजय संघामध्ये कुमारी सिद्धी केंजळे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्व सामन्यांमध्ये गोल नोंदवले, ती संघाची कर्णधार देखील आहे. फॉरवर्ड लाईन मध्ये कुमारी श्रद्धा यादव, कुमारी गायत्री खरात, कुमारी अनघा केंजळे, यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल नोंदवले. हाफ लाईन व बॅक लाईन मध्ये कु. समृद्धी बनकर,कु. समृद्धी दगडे,कु.मानसी पवार, कु. मृण्मयी घोरपडे, कुमारी यांनी देखील चांगली कामगिरी केली. गोलकीपर म्हणून कु. क्षितिजा घोरपडे हिनेदेखील चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
या विजय संघाला सीनियर हॉकी मार्गदर्शक श्री महेश खुटाळे सर, श्री सचिन धुमाळ सर, क्रीडा शिक्षक श्री खुरंगे बी.बी., व कु. धनश्री क्षीरसागर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
या विजय संघास व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार माननीय दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब , महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष ₹ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर, स्कूल कमिटीचे व्हा. चेअरमन रमणलाल दोशी, सदस्य श्री शिरीष शरद कुमार दोशी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, क्रीडा समितीचे सदस्य श्री शिरीष वेलकर , श्री महादेव माने, श्री संजय फडतरे, श्री तुषार मोहिते, प्रा.स्वप्नील पाटील, प्रा. तायप्पा शेडगे तसेच मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगवणे बी. एम., उपप्राचार्य ननवरे ए. वाय., ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य देशमुख डी.एम, पर्यवेक्षक श्री शिंदे व्ही.जी., बगाडे मॅडम , शजाधव जी.ए. , प्रशालेतील सर्व शिक्षक व क्रीडा शिक्षक तसेच दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री बाहुबली शहा, उपाध्यक्ष श्री सचिन लाळगे सदस्य श्री प्रवीण गाडे, श्री महेंद्र जाधव ,माजी राष्ट्रीय खेळाडू श्री सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.
No comments