तंबाखू दिली नाही म्हणून एकावर कोयत्याने वार
सातारा : तंबाखू दिली नाही म्हणून एकावर कोयत्याने वार झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्रतापसिंह नगर येथील हनुमान मंदिराच्या जवळ रोहित जितेंद्र भोसले रा. प्रतापसिंह नगर, सातारा यांनी तंबाखू दिली नाही या कारणास्तव त्यांना तेथीलच मनोज पवार, संतोष लंकेश्वर, दत्ता भोसले, सौरभ महाडिक यांनी लाथाबुक्क्यांनी तसेच कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केले आहे. ही भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या रोहित भोसले यांच्या आईसही धक्काबुक्की करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक कदम करीत आहेत.
No comments