Breaking News

फलटण नगरपरिषदेकडून 'इंडियन स्वच्छता लीग २.०, 'सेवा व सुरक्षा शिबीर, श्रमदान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन

Organized various programs like 'Indian Swachhta League 2.0', 'Service and Safety Camp, Shramdan' by Phaltan Municipal Council

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १ ऑक्टोबर - स्वच्छ भारत अभियान २.० (ना.) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांनी दि. १५ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०२ ऑकटोबर, २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर अभियानाचा भाग म्हणून फलटण नगरपरिषदेने “इंडियन स्वच्छता लीग २.०, सफाईमित्र यांच्याकरिता सेवा व सुरक्षा शिबीर, श्रमदान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

    सदर अभियानाची नोंदणी पोर्टलवर करून एकूण १२ एकूण २४ स्वच्छता विषयक श्रमदान कार्यक्रमांचे आयोजन स्थानिक जनसहभाग, प्रतिष्टीत व्यक्तींच्या उपस्थीतीत करण्यात आले. दि.०१/१०/२०२३ रोजीच्या श्रमदान कार्यक्रमामध्ये ६५० व्यक्तींच्या सहभागाने अंदाजित २२,२५० चौरस मीटर एवढे क्षेत्र स्वच्छ करण्यात येऊन २.९ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या वेळी नगरपरिषदेच्या १६ घंटागाडी, २ ट्रकटर चा उपयोग करण्यात आला.

    श्रमदानामध्ये क्रेडाई फलटण यांनी मालोजीराजे पुतळा व माळजाई परिसर येथे, बिल्डर्स असोसिएशन फलटण यांनी विमानतळ परिसर, मुधोजी महाविद्यालय विद्यार्थी व शिक्षक यांनी महाविद्यालय परिसर, अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय परिसर येथे पोलीस विभागातील कर्मचारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व फलटण शहर पोलीस स्टेशन परिसर येथे, न्यायालय कर्मचारी यांनी फलटण न्यायालय येथे प्राथमिक आरोग्य केंद्र फलटण शहर येथे संबंधित कर्मचारी यांनी तर सर्व शाळा परिसरात विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने सकाळी १०.०० ते ११.०० दरम्यान उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, फलटण शाखा यांनीही सहभाग नोंदवून आवश्यक साहित्यांचा पुरवठा केला.

    अभियानाच्या मूळ उद्देशास अनुसरून दि. २७/०९/२०२३ रोजी फलटण नगरपरिषद प्रशासकीय इमारतीमध्ये सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करून बँकामार्फत उपलब्ध असलेल्या आर्थिक योजनांची माहिती देण्यात आली.

No comments