उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Organized various programs on the occasion of Sharadiya Navratri Festival at Uttar Chidambaram Nataraja Temple
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ते मंगळवार 24 ऑक्टोबर 2023 दरम्यान शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
यामध्ये रविवार दिनांक 15 रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत दुर्गा सप्तशती पारायणm सकाळी दहा वाजता मंदिरातील उमादेवी यांना ललिता सहस्त्रनाम अर्चना आरती व सुवासिनी पूजा तसेच सायंकाळी साडेपाच वाजता श्री शिवकामसुंदरी देवीस ललिता सहस्त्रनाम व अर्चना होणार आहे.
गुरुवार 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी यांचे कडून ललिता पंचमीनिमित्त सौंदर्य लहरी पारायण संपन्न होणार आहे .शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेत वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी व त्यांचे ब्रह्मवृंदांकडून चँडी होम केला जाणारा असून सकाळी दहा ते अकरा या वेळेत कुमारी पूजा केली जाणार आहे. दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी नवमीनिमित्त महिलांद्वारे मंदिरात दीप पूजा सायंकाळी सहा वाजता केली जाणार आहे,आणि मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दसरा सणानिमित्त सकाळी अकरा वाजता महापूजा होऊन श्री उमादेवी विविध अलंकार पूजा तसेच विशेष शाकंभरी म्हणजेच विविध फळभाज्यांच्या व पालेभाज्याच्या अलंकारातील देवीचे रूप सादर केले जाणार आहे.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून यामध्ये गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता नटराज नृत्यकला शाळेच्या शिष्य कु.रुचिरा इंगळे यांचे भरतनाट्यम होणार असून शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता डब्ल्यू नोट गिटार क्लासेस च्या वतीने प्रतीक सदामते व सहकालाकारांचे गिटार वादन होणार आहे.
शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता नृत्य प्रभा ग्रुप सातारा यांचे वतीने ..देवी नमोस्तुते.. हा भरतनाट्यम चा कार्यक्रम सादर होणार असून यामध्ये गुरु सौ. वैशाली पारसनीस शिष्य सायली कुलकर्णी ,अमृता जमदग्नी व गायत्री जोशी या भरतनाट्यम नृत्य सादर करणार आहेत.
रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6ते साडेसात या वेळेत नृत्य निधी पुणे व मुंबईचे कलाकार भरतनाट्यम सादर करणारा असून यामध्ये कविता मेंढेकर- जोशी, श्रद्धा बोधे -सुपेकर व मुग्धा खिरे- पोटभरे या भरतनाट्यम चा कार्यक्रम सादर करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून मंदिराचे वतीने या सर्व कार्यक्रमांना सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश
शानभाग व सर्व विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी तन मन वदनाने आपला सहयोग द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली असून या अभूतपूर्व अशा विशेष मंदिरास भक्तांनी किमान आठवड्यातून एकदा तरी भेट द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
No comments