पेट्री येथील राज कास हिल रिसोर्ट वर पोलिसांचा छापा
सातारा - दि.28/10/2023 रोजी रात्री उशीरा पेट्री ता.जि. सातारा येथील राज कास हिल रिसोर्ट नावचे हॉटेलमधील हॉलमध्ये काही तरुणांनी 6 महिलां आणुन त्यांना बारवाला या संगिताचे तालावर उत्तान कपडयात विभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असलेची माहिती प्राप्त झाली.
पोलीस अधिक्षक, सातारा यांनी सदर माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके यांना दिलेने पोलीस निरीक्षक विश्वजितं घोडके यांनी
उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांचे उपस्थित सातारा तालुका पोलीस ठाणे, सातारा शहर पोलीस ठाणेकडील स्टाफसह राज कास हिल रिसोर्टमध्ये दिनांक 28/10/2023 रोजी 01.00 वा. चे सुमारास छापा टाकला असता सदर रिसोर्टमधील हॉलमध्ये 6 बारवाला हॉलमध्ये असलेल्या एकुण 18 पुरुषांचे समोर आळी पाळीने येवुन उत्तान कपडयात गि-हाईकांच्या समोर उभ्या राहुन बिभत्स हावभाव करुन गि-हाईकांचे जवळ जाऊन त्यांचेशी लगट करीत होत्या सदर बारवालांच्या कृत्यावर गि-हाईक इसम हे आनंद घेऊन नमुद बारबालांवर भारतीय चलनातील नोटा उडवित होते त्यावेळी राज कास हिल रिसोर्टचे मालक, मॅनेजर व वेटर्स हे पोलीसांची चाहुल लागताच सदर ठिकाणावरुन पळुन गेले असुन हॉलमध्ये बारवाला महिलांसोबत डान्स करीत असलेल्या इसमांना पोलीसांनी जागीच ताब्यात घेतले आहे .
हे बसले होते बारबालांसमोर धनंजय शहाजी चव्हाण (वय ३१, रा. अंधारवाडी, उंब्रज, ता. कऱ्हाड), राजेंद्र ज्ञानदेवफाळके (वय ४०, रा. पिरवाडी, सातारा), योगेश सुदाम दीक्षित (वय ३४), अशोक जनार्धन जमदाडे (वय १८, रा. दोघेही रा. मसूर, ता. कऱ्हाड),शंभूराज आबासो भोसले (वय ३३, रा. पेरले, ता. कऱ्हाड), अकबर इकबाल शेख (वय ४३, रा. दत्तनगर, कोरेगाव), प्रशांत नंदकुमार फडतरे (वय ३४, रा. करंजे सातारा), शिवाजी नानासो देशमुख (वय ४३, रा. हामदाबाद फाटा, कोंडवे), अमोल रमेश बोतालजी (वय ३३, रा. कोरेगाव), विनायक संजय जगताप (वय २४), इंद्रजित बाळासाहेब पाटील (वय २८, दोघेही रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड), राजेश दत्तात्रय पवार (वय ४५, रा. धस कॉलनी, सातारा), मिलिंद उत्तम कांबळे (वय ४३, मंगळवार पेठ, सातारा), अमोल प्रकाश शिंगाडे (वय ३४, बुधवार पेठ, कऱ्हाड), जय साहेबराव शेलार (वय ३३, शाहूनगर, सातारा), महेश अरुण गोळे (वय ३०, शाहूनगर, सातारा), प्रकाश हणमंत भोसले (वय ३५, रा. नागठाणे, ता. सातारा), शैलेश बाळासो जाधव (वय २५, रा. मसूर, ता. कऱ्हाड).सदर एकुण 18 इसमांचे ताब्यामध्ये एकुण 82.698 /- रुपये रक्कमचा माल त्यामध्ये रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट जप्त केलेले आहेत. तसेच हॉल मधील जीबीएस कंपनीचा साऊंड सिस्टीम व डिस्को लाईट देखील जप्त करण्यात आली आहे.
No comments