Breaking News

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधीचे दर्शन

Prime Minister Narendra Modi visited Shri Sai Baba Samadhi in Shirdi

    शिर्डी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.

    यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

    यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी साई मंदिराची पाहणी करून मंदिरात उपस्थित भाविकांना अभिवादन केले.

 

No comments