'गंधवार्ता' च्या श्रीमंत संजीवराजे वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ - महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या दैनिक गंधवार्ताच्या वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सरोज व्हीला फलटण येथे करण्यात आले.
याप्रसंगी फलटण दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, संजय गांधी निराधार योजनेचे फलटण तालुकाध्यक्ष बापूराव गावडे, सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार, उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, जयकुमार इंगळे, बुद्धिबळ प्रशिक्षण संस्थेचे संचालक नजीर काझी व दैनिक गंधवार्ताचे संपादक ॲड. रोहित अहिवळे उपस्थित होते.
No comments