मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढत चालली, कुठे मुंडन ,तर कुठे राजीनामा अस्त्र
सातारा - मराठा आरक्षणासाठी मनोज जलांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सातारा जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे सातारच्या आंदोलन स्थळी परिसरातील गावातून ग्रामस्थ सहभागी झाले आहेत .
या ठिकाणी भजन आंदोलनही करण्याचे काम सुरू आहे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील माण मध्ये सामूहिक मुंडन करण्यात आले तर मायणी येथे एसटी बसेस वर काळ्याफुल्या मारून रस्ता रोको आंदोलन करण्यात आली.
खंडाळा तालुक्यातील लोहम सरपंच आणि राजीनामाच्या बाहेर काढले दरम्यान सातारा जिल्ह्यात बाईक रॅली कॅण्डल मार्च आणि निदर्शने करण्यात आली ..जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.. अशा घोषणांनी परिसर दणाणून जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला साताऱ्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून मराठा समाज आक्रमक झाला आहे सातारा जिल्ह्यातील सुमारे 400 हून अधिक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने जिल्हाधिकार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू असून दोघांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. वाई येथेही आंदोलकांनी गुनरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला.
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणात सातारा तालुक्यातील अनेक गावांची ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. यावेळी चिंचणेर, वंदन ,कोंडवे ,शाहूपुरी येथील नागरिकांनी भजन म्हटले. ढोलकी, टाळ- मृदुंगाच्या आवाजाने परिसर दणाणून जात आहे .माण तालुक्यातील इंचगाव येथील आंदोलन कर्त्या मराठा बांधवांनी सामूहिक मुंडन केले असून गजी व ढोल नृत्यावर अनेकांनी फेर धरला तर मायणी येथे रास्ता रोको करण्यात आला आहे.
No comments