पुणे- बेंगलोर महामार्गावर अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन ठार
सातारा - पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यात पाचवड फाटा येथे टेम्पो व कारच्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले. असून एक जण गंभीर जखमी आहे .
पुणे-बंगळूरु महामार्गावर कऱ्हाड जवळील पाचवड फाटा येथे आज दुपारी दीडच्या सुमारास चारचाकी गाडी (एमएच ०१ एल ४५५८) कोल्हापुरकडुन मुंबईकडे निघाली होती. त्यादरम्यान चारचाकीने ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. या भीषण धडकेत चारचाकी गाडीचा पुढील भाग हा ट्रकच्या पाठीमागील भागात घुसला. त्यामध्ये चारचाकीतील तीघांचा मृत्यू झाला.
शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास झालेल्या या अपघातात मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे .कोल्हापूर येथे राजवाडा पोलीस कर्मचारी ठार झाला असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, देखभाल विभागाचे पथक आणि तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी संबंधितांना पुढील उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये हालवले. त्यादरम्यान पुणे-बेंगळुरु महामार्गावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतुक पुर्ववत करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
No comments