गांजा प्रकरणी बोरगाव पोलिसांच्या दोन कारवाया ; 1 लाख 56 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
सातारा प्रतिनिधी - बोरगाव पोलिसांनी एकाच दिवशी दोन स्वतंत्र कारवाया करीत 1 लाख 56 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी सातारा जिल्हयातील अवैध व्यवसायांवर प्रभावी व कठोर कारवाया करण्याबाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार बोरगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविद्र तेलतुंबडे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत कुसवडे, ता. जि. सातारा या गावी गांजाची झाडे लावल्याबाबत तर नागठाणे येथे गांजाची विक्री होत असल्याबाबत बातमी मिळाली. त्याप्रमाणे तेलतुंबडे यांनी अधिकारी व अंमलदार यांच्याकरवी बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत एकाच दिवशी २ स्वतंत्र कारवाया केल्या आहेत.
पहिल्या कारवाईमध्ये अशोक पाड्रंग पवार, रा. कुसवडे, ता. जि. सातारा याने त्याच्या गावी त्याच्या राहत्या घराजवळ गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईमध्ये 5 किलो 130 ग्रॅम वजनाचा व एक्ण 1 लाख 28 हजार 500 रुपये किमतीच्या गांजा सद्रश्य वनस्पती जप्त केल्या आहेत.
दुसन्या कारवाईमध्ये अमोल आण्णा मोहिते हा नागठाणे गांवात त्यांच्या घराजवळ गांजाची विक्री करीत असल्याबाबत मिळालेल्या बातमी अनुषंगाने सदर ठिकाणी केलेल्या छापा कारवाईमध्ये अमोल मोहिते याच्याकड्न 1 किलो 120 ग्रेम वजन व एकुण 28 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रमाणे एकत्रीत 6 किलो 350 ग्रेम वजनाचा व एकुण 1 लाख 56 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत बोरगांव पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी एका गुन्ह्याचा तपास महिला सपोनि डाळींबकर, तर दुसन्या गुन्ह्याचा तपास पोऊनि राजाराम निकम करीत आहेत.
No comments