झेंडू फुलांचा दर पडला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - यंदा झेंडूचे पीक अमाप झाल्याने, फलटणसह सर्वच ठिकाणी झेंडू फुलांचा दर उतरला असून, आज सकाळी १०० ते १५० रुपये किलोने चाललेले झेंडू सायंकाळपर्यंत ५ ते १० रुपये किलो पर्यंत खाली घसरले होते.
दसरा या सणाला व्यवसायासह, घरामध्ये पूजा आणि पुष्पहारांच्यासाठी झेंडू फुलांचा वापर होत असतो, त्यामुळे या सणाला झेंडू फुलाला मोठी मागणी असते. यावर्षी झेंडू फुलांचे पिक सर्वत्र अमाप झाल्याने सर्वच ठिकाणी झेंडू फुलांचे दर घसरल्याचे दिसत आहे. सकाळपासून १०० रुपये ते १५० रुपयांपर्यंत असणारा दर संध्याकाळी ५ ते १० रुपयांपर्यंत पोचला होता. तर आपट्याची पाने ५ ते १० रुपये पेंडी असा होता.
No comments