फलटण ते कन्याकुमारी सायकल यात्रेचा शुभारंभ
फरांदवाडी (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० - फलटण सायकल असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या फलटण ते कन्याकुमारी सायकल यात्रेला रविवार दि. १८ रोजी सकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केल्यानंतर सुरुवात करण्यात आली.
सुमारे १९०० कि. मी. अंतराच्या या सायकल यात्रेत फलटण येथील सागर गायकवाड सर, युगांत शिंदे, आनंदराव काळुखे, स्वप्नील खराडे, सारंग काळुखे हे ५ सायकल पटू सहभागी झाले आहेत.
फलटण जल - त्रिकोश - विजापुर - अलमट्टी - हुलगुंद - हास्पेट - चित्रदुर्ग - तुमकुर - बेंगलोर - सेलम - कारुर - मदुराई - कावेरीपटनम - कन्याकुमारी असा हा १९०० कि. मी. एकूण सायकल प्रवास आहे.
फलटण सायकल असोसिएशनचे प्रमोद निंबाळकर, डॉ. खंडेलवाल, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत मिसाळ, रामकाका मुळीक यांनी ही सायकल यात्रा यशस्वी होण्यासाठी छ. शिवाजी महाराज चौकात उपस्थित राहुन सकाळी सायकल यात्रिंना शुभेच्छा दिल्या.
No comments