जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी व सचिव यांची फलटण येथे कार्यशाळा संपन्न
फलटण - महाराष्ट्र राज्य कृषि मंडळ पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था,तळेगाव दाभाडे, जि. पुणे (NIPHT) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी फलटण येथे हॉटेल जॅक्सन इन,लोणंद रोड येथे सातारा जिल्ह्यातील बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांची पणनविषयक कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 11 वाजता मा.श्री अविनाश देशमुख उपसंचालक, पणन संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे यांचे शुभहस्ते बाजार समित्यांचे सभापती यांचे उपस्थितीत दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी श्री.संदीपकुमार जाधव उपनिबंधक, कराड ,डॉ.सुभाष घुले उपसरव्यवस्थापक,विभागीय कार्यालय पणन मंडळ, कोल्हापूर श्री.पांडुरंग रोकडे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था फलटण सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे सभापती,उपसभापती,संचालक व श्री शंकरराव सोनवलकर सचिव फलटण व इतर सर्व सहकारी सचिव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. सुभाष घुले यांनी मा.नामदार श्री.अब्दुल सत्तार मंत्री, पणन यांचे संकल्पनेतून व मा. श्री संजय कदम ,कार्यकारी संचालक व मा. श्री विनायक कोकरे सर व्यवस्थापक ,कृषि पणन मंडळ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांचे करिता एक दिवसीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. सदर कार्यशाळेच्या निमित्ताने पणन संबंधित महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके यांची पुस्तिका तयार करण्यात आलेली असून ती पुस्तिका बाजार समित्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व सचिवांना बाजार समितीचे कामकाज करताना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सदर कार्यशाळेत कृषि पणन कायदा व त्यामधील महत्त्वाच्या सुधारणा याबाबत श्री.अविनाश देशमुख उपसंचालक,पणन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बाजार समितीचे अधिकार व कर्तव्य याबाबत श्री.संदीप जाधव उपनिबंधक कराड यांनी मार्गदर्शन केले.केंद्र शासनाच्या कृषि पणन विषयक असणाऱ्या विविध योजनासंबंधी ऋग्वेंद्र मुरगोड,उप कृषी पणन सल्लागार मुंबई यांनी मार्गदर्शन केले शेतमालाची निर्यात व कृषि पणन मंडळाचे योगदान याबाबत श्री सतीश वराडे व्यवस्थापक,निर्यात यांनी मार्गदर्शन केले तसेच बाजार समित्यांसाठी असणाऱ्या पणन मंडळाच्या विविध संगणक प्रणाली यासंदर्भात श्री.कैलास फटांगरे,व्यवस्थापक संगणक यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे सभापती उपसभापती व समिती सदस्य व सचिव उपस्थित होते. यावेळी बाजार समितीच्या रँकिंगमध्ये कोल्हापूर विभागातून प्रथम क्रमांक आलेल्या फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती भगवानराव होळकर आणि दुसरा क्रमांक आलेबद्दल लोणंद कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.सुनील शेळके पाटील यांचे व त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ आणि सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे शेवटी श्री. प्रसाद भुजबळ यांनी आभार व्यक्त केले.
No comments