मेरीटच्या आधारावर सर्वांना लाभ मिळावा - खा. श्री.छ.उदयनराजे भोसले
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि.१८ - मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज साताऱ्यात जाऊन श्री.छ.उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांना कानमंत्र दिला.
माध्यमाशी बोलताना छ.उदयनराजे भोसले म्हणाले की, समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मनोज जरांगे आंदोलन करत आहेत.आज जी मानसिकता झाली आहे, ती सर्वांची मानसिकता झाली आहे. मेरिटच्या आधारावर लाभ मिळावा असं मला वाटतं. जातीजातीमध्ये कोण तेढ निर्माण करताहेत हे शोधून काढा. महाराजांनी कोणालाही अंतर दिलं नाही. जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षण द्यावं, अशी भूमिका उदयनाजेंनी मांडली आहे.
आर्थिक निकषावर आरक्षण सर्वांनाच मिळते मला यावर बोलायचे नाही नाहीतर खूप काही बोललो असतो प्रश्न सोडवणार नसाल तर जगायचं कसं जनगणना झाल्याशिवाय मार्ग निघू शकणार नाही प्रत्येकाला जगायचा आणि चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे जातीपातीचा राजकारण सोडून द्या महाराजांचे विचार आचरणात आणा असेही यावेळी उदयनराजे म्हणाले.
कोणाला पाडायचं आहे ते पाडा. मी तर निवडणूक लढवणार नाही. पण, जातीवरुन फूट पाडू नका. देशाचे तुकडे करु नका. नाहीतर देशाची वाट लागेल, अशी हात जोडून विनंती उदयनराजे यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यात उपोषण सुरू केले होते. त्यावेळी राज्य शासनाने जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करुन आरक्षण देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. पण, आरक्षणासाठी त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत शासनाला मुदत दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी राज्यभर दौरा सुरू केला आहे.शनिवारी ते सातारा शहरातील सभेसाठी आले होते. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा समाजबांधवांच्या साखळी उपोषणाला भेट दिली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार त्यांना घालण्यात आलाउपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आयोजकांनी सातारा जिल्ह्यातील आंदोलनाची माहिती जरांगे-पाटील यांना दिली.तसेच सातारचे दोन्ही राजे आरक्षणाबाबत आपल्यासोबत असल्याचेही सांगितले.
नोज जरंगे पाटील यांचे आज साताऱ्यात आगमन झाल्यावर भव्य पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले ...एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी .. चे गजरात पोवई नाका येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्यास त्यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला यावेळी पुष्पृष्टी करून मराठा समाजाने काढलेली रॅली गांधी मैदान येथे आली .त्यानंतर गांधी मैदान येथे उपस्थित असलेल्या हजारो मराठा समाजाचे बांधवां पुढे त्यांनी आपले भाषण केले.
No comments