अस्थी व रक्षा शेतात विसर्जीत करून त्यावर वृक्ष लावून सोनवलकर कुटुंबीयांनी जपल्या स्मृती
दुधेबावी (गंधवार्ता वृत्तसेवा) - हिंदू संस्कृती मध्ये एखादी व्यक्तीचा मृत्यू झालेंनंतर त्याचा सावडनेचा विधी नीरा नदी पात्रावर केला जातो अशी परंपरा आहे. परंतु या परंपरेला फाटा देत दुधेबावी तालुका फलटण येथील पांडुरंग कोंडीबा सोनवलकर यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या अस्थी नीरेला नेण्याऐवजी आपल्या शेतातच पुरून त्यावर वृक्ष लागवड केली असून हा अनोखा उपक्रम सोनवलकर कुटुंबीयांनी दुधेबावीत प्रथमच सुरू केला आहे. कालच त्यांचा सावडण्याचा विधी झाल्यावर त्या ठिकाणी प्रसिद्ध कथाकार,प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी आपल्या पूर्वजांचे अस्थी आणि रक्षा रानातच पुरून वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांचे आवाहनास प्रतिसाद देत सोनवलकर कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे दुधेबावी परिसरातून कौतुक होत आहे. सोनवलकर कुटुंबीयांनी त्या ठिकाणी आंबा या वृक्षाची लागवड केली आहे.या झाडाला दररोज पाणी घालून हा वृक्ष वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्या निमित्ताने वडिलांच्या आठवणी सदैव राहतील असेही त्यांनी सांगितले.
पांडुरंग सोनवलकर यांना तीन मुली व दोन मुले असा परिवार आहे.सध्या एक मुलगा सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक पदावर कार्यरत असून तसेच दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे. तर दुसरा मुलगा चारचाकी गॅरेज चालवतो त्यांच्या या उपक्रमाचे दुधेबावी परिसरात कौतुक होत आहे.
No comments