मराठा आरक्षण मागणीसाठी फलटणमध्ये बोंबाबोंब आंदोलन व सर्वपक्षीय ठरावाची होळी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : मराठा आरक्षण मागणीचा लढा आता अधिक आक्रमक होत असून, राज्यात सर्वत्र विविध आंदोलने सुरू आहेत. फलटण तालुक्यात आमरण उपोषण, साखळी उपोषण, राजकीय नेते मंडळींना गाव बंदी, राजकीय नेत्यांच्या फोटोला काळे फासने, मतदानावर बहिष्कार अशी आंदोलने सुरू आहेत. फलटण येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असणाऱ्या साखळी उपोषण व आमरण उपोषण आंदोलन स्थळी आज सर्वपक्षीय नेत्यांच्या नावाने मराठा आंदोलकांनी बोंबाबोंब आंदोलन करून सर्वपक्षीय ठरावाची होळी केली. या आंदोलनाला मोठ्या संख्येने फलटण तालुक्यात उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे यावेळी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा मराठा आंदोलकांनी दिल्या.
मराठा समाजाच्या तीव्र भावना ह्या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येऊ लागलेल्या आहेत.परंतु सरकार मात्र मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही.नुसती बघ्याची भूमिका पार पाडत असून हे सरकार मूग गिळून बसलेले आहे.आजही अनेक मराठा तरुण आत्महत्या करत आहेत.तरीही ह्या सरकारला पाझर फुटेना झालेला आहे.मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला पाझर फुटणार आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य मराठा विचारू लागला आहे. आज मुख्यमंत्र्यांनी बोलावलं सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा निघण्याची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला होती परंतु या बैठकीत, केवळ बघू करूच भूमिका सर्व पक्षांनी घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजात असंतोषाचे वातावरण आहे, या निषेधार्थ आज फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्वपक्षीय ठरावाची होळी करून सर्व पक्षीय नेत्यांच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसरात परिसर दणाणून सोडला.
No comments