Breaking News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे फलटण मध्ये चक्काजाम आंदोलन

Chakkajam movement of Swabhimani Farmers Association in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजु शेट्टी यांच्या आदेशानुसार गतवर्षी तुटून गेलेल्या ऊसाला प्रति टन ४०० रुपये मिळावेत व चालू हंगामातील तुटून जाणाऱ्या उसाला एक रकमी ३५०० रुपये मिळावेत या मागणीसाठी आज फलटण पंढरपूर रोड जिंती नाका येथे रास्ता रोको करून वहाने अडवून फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

    फलटण तालुक्यातील साखर कारखानदारांनी ऊस दर दिला नाही तर स्वाभिमानी स्टाईल ने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुका अध्यक्ष नितीन यादव यांनी दिला आहे.

    यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर,राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे,जिल्हा सरचिटणीस रविंद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव,पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव,उपाध्यक्ष शकिल सिकंदर मणेर,फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर,प्रल्हाद अहिवळे,माण तालुक्याचे केशव जाधव,किरण विलास भोसले,अर्जुन वारे सर,मनोज वारे,अभिजित गायकवाड,विश्वनाथ यादव सह फलटण परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

    आंदोलन स्थळी फलटण शहर पोलीसांचा चोख बंदोबस्त होता आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.

No comments