फलटण येथे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शुभारंभ
Commencement of giving Kunbi certificate at Phaltan
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती,तसेच त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे समिती नेमली असून, त्या माध्यमातून कुणबीची माहिती गोळा करण्यासाठी महसूल व इतर यंत्रणेने काम सुरू केले असून, त्या दृष्टीने आज फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शुभारंभ केला असून या पहिल्या प्रमाणपत्र वाटपाचा छोटेखानी कार्यक्रम प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित केला होता, यामध्ये पहिले कुणबी प्रमाणपत्र वाटप केले.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या,व ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यासाठी आमरण उपोषण करीत आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे व ते आम्ही घेणारच अशी शिवगर्जना केली होती,व त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सभा घेत राज्य सरकारला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे.
दरम्यान या आज बुधवार दि.२२ नोव्हेंबर रोजी पहिला कुणबी दाखला मयूर मधुकर अलगुडे रा.घाडगेवाडी ता.फलटण या युवकाला हे कुणबी प्रमाणपत्र दिले गेले यावेळी नायब तहसिलदार तुषार देशमुख, संजीवनी सावंत बोबडे मॅडम,व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments