जीवे मारण्याचा प्रयत्न करून दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक ; ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - बोरावकेवस्ती, ता. फलटण येथे दुचाकी स्वाराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून, त्याला जखमी करून टाकलेल्या दरोड्या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत, या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून, त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहितीनुसार, दि. ११ / १० / २०२३ रोजी रात्रौ ९.१५ वा. चे सुमारास यातील फिर्यादी हे मौजे बोरावकेवस्ती ता. फलटण जि. सातारा येथे पोहचले असता त्यांचे पाठीमागुन एका मोटर सायकलवर पाठीमागे बसलेल्या अनोळखी इसमाने लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने, फिर्यादी गाडी वरून खाली पडले. त्यानंतर दुसऱ्या दोन मोटर सायकलवरील ४ जण व पहिल्या मोटर सायकलवर असलेल्या दोन अनोळखी असे एकुण ६ अनोळखी इसमानी मिळुन जबरी चोरी करण्याच्या हेतुने, फिर्यादीस लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने डोक्यात, कानावर दोन्ही पायावर व डावे हातावर जबर मारहाण करून जखमी केले. सदर इसमानी फिर्यादीचे गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन व उजवे हाताचे करंगळी शेजारील बोटातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी व मोबाईल फोन असे जबरीने काढुन घेवुन गेले. म्हणुन वगैरे मजकुरचे फिर्यादी वरुन ६ अनोळखी इसमा विरुध्द फलटण शहर पोलीस ठाणे गु. रजि. नं. ६५१/२०२३ भा.द.वि.स. कलम ३९५,३९७ प्रमाणे दिनांक १८/१०/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा घडल्या नंतर घटनास्थळी पोलीस ठाणे कडील श्री. परीतोष दातीर व गुन्हे प्रकटीकरण पथक हे तात्काळ जावून सदर ठिकाणी उपलब्ध असणारे सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी केली असता सदरचे आरोपी हे पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत आरोपी यांनीच सदरचा गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले, त्याप्रमाणे आरोपी यांचे शोधकामी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथक व इतर स्टाफचे खास पथके तयार करुन, गोपनिय माहीती व आरोपी यांचे मोबाईल नंबरचे तांत्रीक विश्लेषण करून, रेकॉर्डवरील संशयीत आरोपी याची गोपनिय माहीती काढून घेवून, सदर आरोपी यांस ताब्यात घेवुन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण व कसोशिने विश्वासात घेवून, तपास केला असता, यातील आरोपी यांनी कट करुन, त्यांच्या साथीदारासह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपी यांचे कडे त्यांचे साथीदार यांच्या बाबत माहीती घेवून, सदर आरोपी यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी करुन, याप्रकरणी १) मनोज ऊर्फ महेश गणपत इंगळे वय २४ वर्षे रा. मंगळवार पेठ फलटण ता. फलटण जि.सातारा २) राहुल भाऊराव कर्चे वय १८ वर्षे रा. महाराजा मंगलकार्यालयाचे पाठीमागे धनश्री अपार्टमेन्ट फलटण ता. फलटण जि.सातारा मुळ रा. पिंपरी ता. माळशिरस जि.सोलापुर ३) विक्रम शिवाजी भांडवलकर वय १९ वर्षे रा. ठाकुरकी नवामळा ता. फलटण जि.सातारा ४) प्रथमेश रोहिदास यमपुरे वय १९ वर्षे रा. दत्तनगर फलटण ता. फलटण जि.सातारा ५) प्रसाद बीडकर वय १९ वर्षे रा. हणमंतनगर फलटण ता. फलटण जि.सातारा ६) देवांग जाधव वय १९ वर्षे रा. मंगळवारपेठ झिरपेगल्ली फलटण ता. फलटण जि.सातारा ७) सोनल गणेश इंगळे वय २१ वर्षे रा. आखरीरस्ता मंगळवारपेठ फलटण ता. फलटण जि.सातारा. ८) चैतन्य शामबाबु आयरे वय ४३ वर्षे रा. समीर अपार्टमेंट रुम नंबर - १७ विजयनगर बारामती ता. बारामती जि. पुणे यांना नमुद गुन्हयाचे तपास कामी अटक करण्यात आली असुन, आरोपी यांच्याकडुन तपासामध्ये गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल व इतर मुद्देमाल असा एकूण ३,२५,००,०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास श्री. परीतोष दातीर, पोलीस उपनिरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे हे आहेत.
सदरची कामगीरी सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. परीतोष दातीर, पो.उप.नि.सुरज शिंदे, पोलीस हवालदार वाडकर, पोलीस हवालदार धापते, पोलीस हवालदार धायगुडे, पोलीस हवालदार फाळके, महिला पोलीस हवालदार वाघ,पोलीस हवालदार जगताप, पोलीस हवालदार काळुखे, पोलीस हवालदार नाळे, पो.कॉ. १९५१ पाटोळे, पो.कॉ. कर्णे, पो.कॉ. अवघडे, पो.कॉ. खराडे, पो.कॉ. टिके, पो.कॉ. जगदाळे, पो.कॉ. घोरपडे, पो.कॉ. देशमुख, पोलीस हवालदार सजगने, पोलीस हवालदार यादव, पो.कॉ जगदाळे, पोलीस हवालदार भिसे यांनी सदरची कारवाई केली आहे.
१) मनोज ऊर्फ महेश गणपत इंगळे वय २४ वर्षे रा. मंगळवार पेठ फलटण ता. फलटण जि.सातारा २) राहुल भाऊराव कर्चे वय १८ वर्षे रा. महाराजा मंगलकार्यालयाचे पाठीमागे धनश्री अपार्टमेन्ट फलटण ता. फलटण जि.सातारा मुळ रा. पिंपरी ता. माळशिरस जि.सोलापुर ३) विक्रम शिवाजी भांडवलकर वय १९ वर्षे रा. ठाकुरकी नवामळा ता. फलटण जि.सातारा ४) प्रथमेश रोहिदास यमपुरे वय १९ वर्षे रा. दत्तनगर फलटण ता. फलटण जि.सातारा ५) प्रसाद बीडकर वय १९ वर्षे रा. हणमंतनगर फलटण ता. फलटण जि.सातारा ६) देवांग जाधव वय १९ वर्षे रा. मंगळवारपेठ झिरपेगल्ली फलटण ता. फलटण जि.सातारा ७) सोनल गणेश इंगळे वय २१ वर्षे रा. आखरीरस्ता मंगळवारपेठ फलटण ता. फलटण जि.सातारा. ८) चैतन्य शामबाबु आयरे वय ४३ वर्षे रा. समीर अपार्टमेंट रुम नंबर - १७ विजयनगर बारामती ता. बारामती जि. पुणे.
No comments