इंस्टाग्राम वर ओळख झालेल्या मुलीचे अपहरण करून केले लग्न ; दोघांच्या विरोधात अपहरण व बलात्काराचा गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ओळख झालेल्या मुलीचे अपहरण करून, तिच्याबरोबर लग्न करून, तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दरम्यान दोन्ही संशयित आरोपींना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे.
सुरज जाधव रा.पेडगाव ता.खटाव जि. सातारा व मल्हारी जयसिंग चव्हाण रा. आंधळी ता.माण जि.सातारा अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित आरोपी व पीडित मुलगी यांची इंस्टाग्राम वरून ओळख झाली, ओळखीतून संशयित आरोपीने तिला जबरदस्तीने लग्नाची मागणी घातली, पीडित मुलीने तिच्या घरच्यांना विचारा, असे सांगितले असताना, सुद्धा दोन्ही संशयित आरोपी यांनी संगणमताने पीडित मुलीचे आहरण केले व पेडगाव ता.खटाव येथे नेले. तिच्याबरोबर रानात लग्न केले. दि. २१/११/२२०३ रोजी संशयित सुरज जाधव हा बाथरूमला गेल्यावर त्याच्या मोबाईल वरून, पीडित मुलीने तिच्या भावास फोन करून, सर्व हकीकत सांगितली. व तुम्ही मला न्यायला या, मला येथे थांबायचं नाही, सूरज जाधव यांनी माझी फसवणूक करून, माझ्यावर जबरदस्ती करून, माझ्या इच्छेविरुद्ध लग्न केलेले आहे व शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत असे सांगितले, त्यानंतर पीडित मुलीचे आई वडील पेडगाव येथे, मुलीला न्यायला आले, तेव्हा सुरज जाधव हा कुठेतरी निघून गेला होता, त्यानंतर पीडित मुलगी आई वडिलांसोबत फलटण तालुक्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे हे करीत आहेत.
No comments