पतीने पत्नीला पेटवले ; पतीवर हाफ मर्डरचा गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ - पिंपरद गावचे हद्दीत पत्नीला जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरोधात हाफ मर्डरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली असून, पती देखील किरकोळ जखमी झालेला आहे.
शंकर महादेव पवार रा.पिंप्रद ता.फलटण जि.सातारा असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून औषध उपचार सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक २३/११/२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मौजे पिप्रद ता. फलटण गावचे हद्दीत, फिर्यादी सायली अमित पवार यांची सासू घरातील देवाला दिवाबत्ती करीत असताना, सासरे शंकर हे स्वयंपाक करत असलेल्या शेडमध्ये आले व शेडमध्ये ठेवलेली पेट्रोलची बाटली घेऊन देवघरात गेले, त्यानंतर सासू मोठ्याने ओरडत बाहेर पळत आली, फिर्यादी यांनी पाहिले असता, सासू पडलेल्या अवस्थेत दिसली, सासू त्यांच्या भाषेत शंकरने माझ्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याच्या उद्देशाने मला दिव्यावर ढकलून दिले आहे असे म्हटली असल्याची फिर्याद सुन सायली पवार यांनी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक हुलगे हे करीत आहेत.
No comments