भजन स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भजन- कीर्तनकार यांना पुढे आणण्याचा मालोजीराजे प्रतिष्ठानचा प्रयत्न - आ.दीपकराव चव्हाण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला वर्ग दिवसभराच्या कामातून थकल्यानंतर सायंकाळी भक्ती किंवा नामस्मरणासाठी काहीकाळ भजन, कीर्तन यामध्ये रमतात. त्यांना लय, ताल, स्वर यापेक्षा परमेश्वर भक्ती अधिक महत्वाची असली तरी त्यामध्येही अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी स्त्री - पुरुष आहेत, त्यांना या भजन स्पर्धांच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा आणि इतरांना प्रोत्साहन देण्याचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ. दिपकराव चव्हाण यांनी केले.
श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान आयोजित पुरुष व महिलांसाठी दि. १७ व १८ नोव्हेंबर रोजी संत ज्ञानेश्वर मंदिर, फलटण येथे आयोजित भजन स्पर्धांचे उद्घाटन आ. दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य विश्वासराव देशमुख होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ व्हा. चेअरमन रमणलाल दोशी, प्रतिष्ठानचे सदस्य शिवाजीराव घोरपडे, प्राचार्य अरविंद निकम, प्राचार्य अर्जुन रुपनवर, प्रा. डॉ. अशोक शिंदे, मुधोजी महाविद्यालय उप प्राचार्य डॉ. संजय भजन स्पर्धेचे परीक्षक ह.भ.प. मोहनराव गिरी गोसावी व अनंत नेरकर आणि विविध भजनी मंडळ सदस्य उपस्थित होते.
प्रामुख्याने ग्रामीण भागात भजन, कीर्तन यामध्ये सहभागी असणारा, त्यामध्ये रममाण होणारा सामान्य माणूस, शेतकरी, महिला यांना आपली कला सादरी करणाची संधी मिळावी, शहरी भागातील उपक्रमात सहभागी होता यावे या उद्देशाने श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान गतवर्षी पासून भजन स्पर्धांचे आयोजन करीत असल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. सौ. नीलम देशमुख यांनी केले. आभार डॉ. नीलिमा दाते यांनी मानले.
No comments