आज फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा मेळावा
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये फलटण येथे महाराजा मंगल कार्यालय या ठिकाणी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी प्रत्येक गावातील महत्वाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
फलटण येथील जिद्द या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जेष्ठ नेते सुभाष शिंदे बोलत होते.
यावेळी बोलताना सुभाष शिंदे म्हणाले की, फलटण तालुक्यासह फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात खासदार शरद पवार यांच्या विचाराचे अनेक कार्यकर्ते व नागरिक कार्यरत आहेत. या सर्वांनी एकत्रित येऊन आगामी कळमध्ये काम करण्यासाठी एकत्रित आढावा बैठक बोलावली आहे. तरी प्रमुख कार्यकर्त्यांनी प्राध्यान्याने उपस्थित राहावे; असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments