ऑपरेशन मुस्कान : फलटण ग्रामीण पोलिसांनी शोधल्या 10 महिला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - पोलीस ठाण्यामध्ये महिला हरवल्याबाबत अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. इतर कामांपेक्षा महिलांच्या सुरक्षा साठी पोलीस दलातर्फे कायमच अग्रक्रम दिला जातो. पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांच्यातर्फे एक ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत ऑपरेशन मुस्कान महिला शोध मोहीम राबवण्यात आली. सदर आदेशान्वये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचाल दलाल व पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी फलटण ग्रामीण पोलिसांना जास्तीत जास्त हरवलेल्या महिलांचा शोध घ्यावा याबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक दिपाली अलगुडे सस्ते, महेश सूर्यवंशी व पोलीस शिपाई सोमनाथ टिके व बीट अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले, या पथकाने एक महिन्यांमध्ये एकूण दहा महिलांचा शोध लावलेला आहे व सदर महिला सुखरूप यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलेल्या आहेत. यापुढे सुद्धा जुन्या हरवलेल्या महिलांचा शोध घेण्याची मोहीम चालू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.
No comments