Breaking News

फलटण येथे पी.एम. किसान योजनेच्या १५ व्या हप्त्याचे वितरण सुरू

P.M. at Phaltan. Distribution of 15th installment of Kisan Yojana started

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - पी. एम. किसान योजनेचा १५ वा हप्ता केंद्र शासनातर्फे दि. १५ नोव्हेंबर २०२३ पासून अदा करणेस सुरुवात झाली आहे. यापूर्वीचा १४ वा हप्ता हा केंद्र शासनातर्फे दि २७ जुलै २०२३ पासून अदा करणेत आला होता. यामध्ये फलटण तालुक्यातील ५३६७५ पात्र लाभाथ्यर्थ्यांना आजअखेर १४ व्या हप्त्याचा लाभ देणेत आला आहे. तसेच काही लाभार्थ्यांना तांत्रिक कारणास्तव याचा लाभ मिळाला नव्हता, त्यांचे प्रकरणी पडताळणी करुन ते पात्र होत असलेस जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांचे स्तरावर त्यांचा लाभ पूर्ववत करणेबाबत अलहिदा पत्रव्यवहार करणेत आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रसिद्धीस दिली.

    ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्यांनी pmkisan.gov.in वेबसाईटवर जाऊन Farmer's corner या पर्यायावर क्लीक करुन Beneficiary Status वर जावे, तेथे आधार क्रमांक करून टाकुन Get Data वर क्लीक केले असता आपला लाभ कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे हे समजून येईल. यासाठी आपल्याला जवळच्या महा-ई-सेवा केंद्रास भेट देऊन तिथूनही ही गोष्ट माहित करुन घेता येईल. तथापि असे लाभ न मिळालेले लाभार्थी हे तहसील कार्यालय, फलटण येथे गर्दी करून आपले स्टेटस चेक करून द्यावे अशी विनंती करत असतात. याबाबत तहसील कार्यालयाकडून त्यांना वेळोवेळी सहकार्य करणेत येते परंतु अशा प्रकारे स्टेटस चेक करणेत वेळ जात असलेने पात्र लाभार्थ्यांना लाभ देणेस विलंब होतो याची नोंद घेवून शेतक-यांना विनंती करणेत येत आहे की त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर वरील पद्धतीने अथवा महा-ई-सेवा केंद्रातून आपले स्टेटस चेक करुन घ्यावे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे कृषी आयुक्तालय यांचेकडील निर्देशानुसार पी, एम किसान योजनेतील सेल्फ फार्मर रजिस्ट्रेशन, आधार लिंकींग, बैंक अकाउंट लिंकींग, ई-केवायसी पात्र लाभार्थ्यांची तांत्रिक कारणास्तव अपात्रता मागे घेणे इत्यादी कामकाज यापुढे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पार पाडले जाणार आहे तहसील कार्यालयाकडे अर्जदार लाभार्थी याचेकडे शेतजमीन आहे का (लँड सीडींग) याची पडताळणी करणे आणि अपात्र लाभार्थी यांचेकडून त्यांनी वसुली करणे या दोनच जबाबदा-या राहणार आहेत तसेच ग्रामविकास विभागाने प्रत्येक महिन्यात गावनिहाय मयत लाभार्थ्यांची यादी कृषी विभागास कळवणे अपेक्षित आहे.

    पी.एम किसान योजनेचा प्रथम लाभ दि. २४ फेब्रुवारी २०१९ पासुन देणेस सुरुवात झाली. या योजनेमध्ये शेतकरी असलेल्या व्यक्तीने (शेतजमीन धारक), आयकर न भरणारे, शासकीय नोकरीत नसणारे तसेच प्रतिमाह १००००/- रु पेक्षा कमी पेन्शन घेणारे निवृत्त कर्मचारी यांनीच लाभ घेणे अपेक्षित होते. असे असुनही पात्र नसणाऱ्या व्यक्तीनी या योजनेचा लाभ घेतलेचे केंद्र शासनाचे निदर्शनास आले आहे.

    याबाबत फलटण तालुक्यातील आयकर भरणारे अथवा शासकीय नोकरीमध्ये कार्यरत असणारे अथवा प्रतिमाह रु पेक्षा जास्त पेन्शन घेणारे एकूण ३५९४ अपात्र लाभार्थी यांनी लाभ घेतला असलेने त्यांचेकडून एकूण खकम रु ४,२९,५२,०००/-  वसूल करणेची कार्यवाही संबंधितांना नोटीस देऊन सुरु करणेत आली आहे.

    त्याशिवाय फलटण तालुक्यातील अन्य अपात्र लाभार्थी म्हणजे शेतजमीन नावावर नसणारे, दुबार लाभ घेणारे अशा प्रकारचे ३३१४ लाभार्थी यांचेकडुन एकुण रक्कम रु. ४,६२,४८,०००/-  वसुल करणेची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

    अपात्र लाभार्थ्यांनी तलाठी अथवा तहसिल कार्यालय फलटण येथे चेक अथवा डोडीने लाभाची रक्कम जमा करुन प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा त्यांची स्थावर / जंगम मिळकत जप्त करुन वसुली करणेत येईल, याप्रमाणे आवाहन तहसील कार्यालय फलटण यांचेतर्फे करणेत येत आहे.

No comments