फलटण एसटी आगार जिल्ह्यात अव्वलस्थानी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण एस.टी.आगाराने भाऊबिजे दिवशी विक्रमी ऊत्पन्न मिळवुन सलग तिसऱ्या वर्षी सातारा विभागात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
विभाग नियंत्रक रोहन पलंगे व विभागीय वाहतुक अधिकारी ज्योती गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी प्रभारी स्थानक प्रमुख सुहास कोरडे,सहाय्यक वाहतुक निरीक्षक धिरज अहिवळे व सर्व पर्यवेक्षक यांच्या सहकार्याने ७७ बसेस द्वारे ऊत्कुष्ट नियोजन करुन, विवीध मार्गावर जादा बसेसचे नियोजन करुन एकुण २८,७९६ कीलो मिटर करुन तब्बल १२,२६,७३२ रुपये एवढे ऊत्पन्न मिळवुन सातारा विभागात सलग तीसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला.या यशा बद्दल बोलताना रोहित नाईक यांनी सर्व चालक-वाहक,कार्यशाळा कर्मचारी अधीकारी सर्वाचेच सहकार्य लाभल्याचे नमुद केले.
या यशाबद्दल विभाग नियंत्रक रोहन पलंगे,विभागीय वाहतुक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी फलटण आगाराचे अभिनंदन केले.
No comments