आरक्षण १०० टक्के मिळणार ; फक्त एकजूट फुटू देऊ नका - मनोज जरांगे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - कुणबीच्या नोंदी मिळाल्यात, म्हणजे मराठा समाज शंभर टक्के ओबिसी आरक्षणात जाणार आहे, फक्त मराठा समाजाने एकजूट फुटू देऊ नका असे आवाहन मराठा योध्दा मनोज जरांगे- पाटील यांनी फलटण येथे केले.
मायणी येथे कार्यक्रमासाठी जात असताना फलटण येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना क्षणभर का होईना बोला अशी विनंती केल्यानंतर त्यांनी वरील आवाहन केले.
मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाचे आरक्षण, आता कुठ पर्यंत आलयं ते सर्वांनाच माहिती आहे. आरक्षणामुळे आपल्या लेकरा-बाळांचं कल्याण होणार आहे. लेकराबाळांना मोठं करायची हीच संधी आहे. मराठ्यांना ही संधी चालून आलीय, ती घालवू नका, ती पुन्हा मिळणार नाही. त्यासाठी मराठा समाजाने एकजूट ठेवावी असे आवाहनही फलटण येथे उपस्थितांशी संवाद साधताना मनोज जरांगे-पाटील यांनी केले.
No comments